ग्रामपंचायत वडपे ही महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कार्यरत असून स्थानिक नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे, शासकीय योजना राबविणे आणि गावाचा सामाजिक,आर्थिक व पायाभूत विकास साधणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ग्रामविकासाचे ध्येय
ग्रामपंचायत वडपेचे मुख्य ध्येय म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन राबविणे आणि गावाचा शाश्वत व सर्वांगीण विकास घडवून आणणे.